Available courses

प्लंबर हा एक आरोग्य रक्षकच आहे. दूषित पाण्यापासून होणार्‍या आजारांपासून बचाव करायचं कार्य प्लंबर करतो. योग्यरीत्या केलेले प्लंबिंग इमारतीचे आयुष्य तर वाढवतेच तसेच मानवाचे आरोग्यही सुरक्षित ठेवते.

ह्या कोर्स मध्ये सुरुवातीला प्लंबिंगची व्याप्ती किती मोठी आहे ते समजून घेणार आहात ज्यामध्ये प्लंबिंगचा इतिहास ते आधुनिक काळातील बदल ह्याबद्दल माहिती होईल. त्यानंतर प्लंबिंगचे महत्व तसेच त्यासाठी एक प्लंबर म्हणून काम करताना आवश्यक असणारी विशिष्ट कौशल्ये यांची माहिती होईल. तसेच आवश्यक असणारी वैयक्तिक सुरक्षा साधने, सुरक्षा चिन्हे, प्लंबिंग टूल्स आणि ती टूल्स साईटवर वापरताना घ्यायची काळजी आणि त्यांचा सुयोग्य वापर समजून घ्याल.

त्यानंतर प्लंबिंग मध्ये वापरले जाणारे विविध प्रकारचे पाईप तसेच फिक्स्चर, व्हॉल्व्ह याबद्दल माहिती करून घ्याल. विविध प्रकारच्या पाईपची वैशिष्ट्ये त्यांच्या वापराचे फायदे, तोटे आणि जोडण्याची पद्धत याची माहिती घ्याल. पाणीपुरवठा तसेच ड्रेनेज सिस्टीम यांची योग्यरीत्या उभारणी, त्यांचे प्रकार याची माहिती करून घ्याल.

ह्या कोर्समुळे तुम्हाला नक्कीच प्लंबिंग मधील सध्या प्रचलित असलेल्या सर्व बाबींची माहिती मिळेल. प्लंबिंग प्रणाली कशी काम करते तसेच त्यासाठीचे प्लंबिंग कोड कोणकोणते आहेत याची माहिती होईल. ही माहिती आणि तुम्ही मिळवणाऱ्या कौशल्याने तुमच्या करीयरला एक नवी दिशा मिळेल. चला तर मग ह्या कोर्सला आजच सुरुवात करून आपल्यातील असलेल्या क्षमतांना चालना देऊया.